रवी राणांविरोधात अटक वॉरंट जारी;  विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मविआची खेळी ?

Mumbai –  विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान,  विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचेही महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, एका बाजूला या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला अमरावती न्यायालयाने अमरावतीचे खासदार रवी राणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अमरावती पोलीस हे जामीनपात्र वॉरंट घेऊन रवी राणांना देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील खार येथील घरी आले होते. मात्र, रवी राणांच्या घरी कोणीही नसल्याने हे वॉरंट स्विकार करण्यात आलेलं नाही.

अमरावती पोलिसांनी खार यांनी पोलिसांची मदत घेतली आणि ते हे वॉरंट घेऊन रवी राणांच्या घरी गेले. पण, तेव्हा रवी राणा किंवा खासदार नवनीत राणा हे घरी नव्हते. त्यामुळे पोलीस वॉरंट न देताच परतले. रवी राणा यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तारखेला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट काढल्याची माहिती आहे.