हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल – ओवेसी

नवी दिल्ली – खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी मोठं वक्तव्य केलंय. हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल, असं ओवेसी म्हणाले आहेत. या वक्तव्यामुळे आज उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांनी रविवारी एक व्हिडीओ ट्विट केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “हिजाब परिधान केलेल्या महिला महाविद्यालयात जातील, जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, डॉक्टर, व्यवसायिक महिला होतील. मी कदाचित हे पाहण्यासाठी जिवंत नसेन, परंतु माझे शब्द लिहून ठेवा की एक दिवस हिजाब परिधान केलेली मुलगी या देशाची पंतप्रधान होईल.

ते पुढे म्हणाले, “जर आमच्या मुलींनी हिजाब घालायचे ठरवले आहे आणि त्यांच्या पालकांना त्यांना हिजाब घालायचे आहे, तर त्यांचे पालक त्यांना पाठिंबा देतील. त्यांना कोण रोखतंय ते आम्ही पाहू!”