२२ तारखेला सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस सुट्टी; ओवेसी म्हणाले…

Ram Mandir Inauguration: राम मंदिराच्या उद्घाटनाची (Ram Temple Inauguration) जोरदार तयारी सुरू असताना केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) गुरुवारी (18 जानेवारी) मोठी घोषणा केली. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी सांगितले की, 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेक दिनी सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हा सर्वांचा विकास आहे, असे त्यांनी गुरुवारी (18 जानेवारी 2024) उपहासात्मकपणे सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

हैदराबादचे खासदार ओवेसी म्हणाले, भाजप शासित राज्याने ईद मिलाद उन नबीची सुट्टी रद्द केली. घटनात्मक प्राधिकरणाने शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी 30 मिनिटांचा ब्रेक रद्द केला. हा सर्वांचा विकास आहे, परंतु कोणाचेही (बहुसंख्य वगळता) तुष्टीकरण नाही.अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिर होतंय याचा आनंद; मांस विक्री करणार नाही; कुरेशी समाजाचा निर्णय

Facebook Scam: महिलेला गरोदर करण्याचे 10 लाख रुपये मिळतील… या गर्भधारणेच्या घोटाळ्याला बळी पडू नका!

दोन भावांनी राम मंदिरासाठी बनवला सोन्या-चांदीचा झाडू, लवकरच अयोध्येला पाठवणार