Pune LokSabha 2024 | वसंत मोरे अपक्ष उभे राहिल्यास फटका मोहन जोशींना बसेल? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

आगामी पुणे लोकसभेची ( Pune LokSabha 2024) निवडणुकीबाबतची रणनीती ठरवण्यासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील विधानसभा मतदार संघ निहाय बैठका सुरू आहे. एकीकडे भाजपाकडून उमेदवारी निश्चिती करून प्रचाराची रणनीत आखण्यात येत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या गोटामध्ये अद्यापही उमेदवारी बाबतची खलबत्त सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही. अशातच आज झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा उल्लेख केल्याने सर्वांच्या भोय उंचावल्याचा पाहायला मिळालं.

महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची ( Pune LokSabha 2024) जागा ही काँग्रेसला सुटणार असल्याचं जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यादृष्टीने काँग्रेस कडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी वीस जणांनी इच्छा प्रदर्शित केली असली तरी प्रामुख्याने चार नाव सर्वाधिक चर्चेत आहेत. यामध्ये कसबे चे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आणि ज्येष्ठ नेते आबा बागुल. इच्छुकांकडून आपापल्या परीने वरिष्ठांकडे मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे. मात्र अद्याप तरी कोणत्याही एका नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही. काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे हे देखील फिल्डिंग लावत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

मोरे यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र अंतर्गत विरोधामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा दिलाच समोर आला आहे. त्यामुळे कोणताही परिस्थितीमध्ये मोरे ही निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातंय वेळप्रसंगी ते अपक्ष ही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. मोरे हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास त्याचा फटका कोणाला बसू शकतो याबाबत चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारला असता पाटील म्हणाले, वसंत मोरे हे अपक्ष लढले तरी भाजपला त्याचा फटका बसणार नाही. कारण भाजपची मूळची मत आहे ती भाजपकडेच राहणार आहे. मागील वेळी मिळालेल्या सहा लाख 31000 मताधिक्य भाजपचं कायम राहणार आहे. त्यामुळे मोरे जर अपक्ष उभे राहिले तर भाजपची मते खाणार नाही.तर समोरच्यांची म्हणजेच मोहन जोशींची मते खातील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका