जे लोक स्वतःला राजकीय दावणीला बांधून घेतात ते कीर्तनकार असू शकत नाहीत – अंधारे

पुणे- ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदू देवीदेवतांची यथेच्छ बदनामी केली आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यांनी मोर्चा अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाकडे वळवला आहे.

वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच महाबली हनुमान यांच्याबाबत अक्षरशः गरळ ओकली आहे. त्यांच्या भाषणामधील काही वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. अनेक वारकरी, तसेच कीर्तनकार यांनी अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, कीर्तनकार सुनिता अंधाळे यांनीही सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आता अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जे लोक स्वतःला राजकीय दावणीला बांधून घेतात ते कीर्तनकार असू शकत नाहीत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी सुनिता अंधाळे यांच्यावर केली आहे. मला काही लोकांनी काही व्हिडिओ दाखवले. यामध्ये कोणीतरी फार अश्लाघ्य भाषा वापरली आहे. मला हे लोक कीर्तनकार वाटत नाहीत. जे लोक अत्यंत गलिच्छ भाषा वापरतात जे आपल्या मनातून अद्याप काम-मोह-क्रोध-मत्सर अजून काढू शकलेले नाहीत.