बॉलीवूडच्या खलनायकाने वयाच्या ६०व्या वर्षी बांधली लग्नगाठ, आशिष विद्यार्थी अडकले विवाहबंधनात

Ashish Vidyarthi wedding: बॉलिवूडचा आवडता खलनायक आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या ६० व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआशी (Rupali Barua) लग्न केले आहे. आशिष यांनी रुपालीसोबत गुरुवारी (२५ मे) नोंदणीकृत विवाह केला आहे. अभिनेत्याचे हे दुसरे लग्न आहे.

आशिष त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या निमित्ताने म्हणाले, ‘आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक असामान्य भावना आहे.’ आशिष यांनी ११ हून अधिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते वर्षानुवर्षे चित्रपट जगताचा एक भाग राहिले आहेत. आशिष आणि रुपालीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गुरुवारी कोलकाता येथे पार पडलेल्या या लग्नात फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे कपल मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत. आशिष यांच्या वधूबद्दल बोलायचे तर ती आसाममधील फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील रहिवासी रुपाली ही कोलकात्यात एका फॅशन स्टोअरची मालकीण आहे.