पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी जयसिंगराव तलावातील गाळ काढा – राजे समरजितसिंह घाटगे

कागल – यावर्षी यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कागल शहरास पाणीपुरवठा करणारा जयसिंगराव तलाव कोरडा व उघडा पडलेला आहे. तलावातील पाणीसाठा  पूर्णच कमी झालेला असून कागल शहरास पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.यावर उपाय म्हणून भविष्याची गरज ओळखून पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी  कागल नगरपालिका प्रशासनाने जयसिंगराव तलावातील गाळ काढन्यासाठी तात्काळ  लक्ष घालावे त्यासाठी शासन पातळीवर आवश्यक ते सहकार्य करू. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. जयसिंगराव तलावातील घटलेल्या पाण्याच्या पातळीच्या पाहणीवेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, हा तलाव वर्षानुवर्ष कागल वासियांची तहान भागवत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात यावर्षी या तलावातील पाण्याने तळ गाठला आहे.  लवकर पाऊस न झाल्यास याची तीव्रता आणखी वाढणार आहे. सध्या या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.  हा गाळ काढलेस  पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी. जलसंपदा विभागाकडून या तलावातील गाळ काढण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध आहे.ती आणून यांत्रिकी करणाने हा गाळ काढलेस ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत माने ,सतीश पाटील, दीपक मगर, युवराज पसारे, विवेक कुलकर्णी,रमिज मुजावर, आदी उपस्थित होते.

दरम्यान, जयसिंगराव तलाव बारमाही तुडुंब भरून कागलवासियांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. असे वक्तव्य आमदार हसन मुश्रीफ यांनी गतवर्षी  केले होते.मात्र गेले दोन महिन्यापासून शहरवासीयांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. तसेच  मागील वर्षी तलाव कायम भरण्यासाठी कालव्यातून तलावात पाणी सोडण्याच्या कामाचे विद्यमान आमदारसाहेब यांनी उद्घाटन केले.परुंतू कालव्यातून पाणी सोडणेची चुकीची जागा निवडल्यामुळे कालव्यातून तलावात पाणी जाण्याऐवजी उलटे तलावातून कालव्यात पाणी येते.अशी माहिती उपस्थित नागरिकांनी  श्री घाटगे  यांना  दिली. यावर शासन दरबारी पाठपुरावा करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे गा-हाणे मांडले. त्यावर घाटगे  यांनी लवकरच या बाबतीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व पाटबंधारे विभागाशी बोलू. असे घाटगे म्हणाले.