विधानसभा निवडणूक : उमेदवारांना समोसे, पीपीई किट,पूजेच्या खर्चाचा तपशीलही द्यावा लागणार 

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या काळात यावेळच्या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका खूप वेगळ्या असणार आहेत. यावेळी निवडणूक आयोगाने निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा तर वाढवलीच, पण काही सूचनाही जारी केल्या आहेत.

विधानसभा निवडणुका 2022 कोविड प्रोटोकॉल मार्गदर्शक तत्त्वांनुसार होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवारांना खाण्यापिण्याचे, मास्क, सॅनिटायझर, साबण, पीपीई किटसह खर्चाचा तपशील देण्यास सांगितले आहे. निवडणुकीत झालेल्या प्रत्येक खर्चाची माहिती द्यावी लागेल, ज्याचा थेट संबंध निवडणुकीत झालेल्या खर्चाशी असेल.

यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार 40 लाखांपेक्षा जास्त खर्च करू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील डीएम आणि सर्व पक्षांच्या उमेदवारांची बैठक घेऊन प्रत्येक खर्चाची दर यादी निश्चित केली आहे. यावेळी कोविड 19 पासून बचाव करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च निवडणूक खर्चाशी जोडण्यात आला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने तक्रार कक्षही सुरू केला आहे. जिथे निवडणूक संबंधित तक्रारी करता येतील.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले दर

पीपीई किट 300 रुपये प्रति नग

थ्री लेयर मास्क 2 रुपये प्रति नग

सेनेटाइजर 100 ml 18 रुपये प्रति नग

सेनेटाइजर 500 ml 67 रुपये प्रति नग

सेनेटाइजर 1000 ml 130 रुपये प्रति नग

सेनेटाइजर 5000ml 600 रुपये प्रति नग

फेस शील्ड 30 रुपये प्रति नग

थर्मल स्कैनर 973 रुपये प्रति नग

चहा – 7 रुपये, कॉफी – 10 रुपयेसमोसा – 10 रुपये
मिनरल वाटर 20 रुपये प्रति बॉटल
लाडू – 200 रुपये प्रति kg
नमकीन 180 रुपये प्रति kg
बिस्किट 300 रुपये प्रति kg

पूजेच्या खर्च- 1100 रुपये