Israel | इस्राइलकडून राफाह शहरावर हल्ला; 22 जण ठार  

गाझा पट्टीतल्या राफाह शहरावर इस्राइलनं (Israel) केलेल्या हल्ल्यात 22 जण ठार झाले आहेत. यात 18 बालकांचा समावेश आहे. पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं गाझा पट्ट्यातल्या मानवता मदतीसाठीच्या 9 कोटी डॉलर्ससह इस्राइलला 263 कोटी डॉलर्सची मदत मंजूर केली आहे. त्यानंतर लगेचच इस्राइलनं हा हल्ला केला.

सुमारे 23 लाख शरणार्थींनी आश्रय घेतलेल्या राफाह शहरावर इस्राइल (Israel) जवळपास रोजच हवाई हल्ले करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन हल्ले रोखण्याचं आवाहन होत असूनही इस्राइल या शहरात लष्करी अतिक्रमण करत आहे. इस्राइल हमास संघर्षात आतापर्यंत 34 हजारपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्राइलनं पश्चिम किनाऱ्यावरची सर्वात मोठी लष्करी कारवाई संपुष्टात आणली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन