ओम फट स्वाहा.. हार्दिकने चेंडूला पकडून मंत्र म्हटला अन् पाकिस्तानी फलंदाज झटक्यात आऊट झाला!

Hardik Pandya: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात शानदार सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात दमदार होती. अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. यानंतर मोहम्मद सिराजने शफीकला तर हार्दिक पंड्याने इमाम उल हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, या दोन विकेट्सबाबत काही रंजक घटना समोर आल्या आहेत.

वास्तविक, शफीक खूप धावा करत होता. त्याने 23 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या होत्या. हे पाहून पाकिस्तानच्या डावातील आठव्या षटकात विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार रोहित शर्माकडे गेला. त्यानंतर तो रोहितला काही टिप्स देताना दिसला, ज्या रोहित लक्षपूर्वक ऐकताना दिसला. टिप्स घेताच रोहितने (Captain Rohit Sharma) सिराजशी बोलून क्षेत्ररक्षणात बदल केले. सिराजने पुढचा चेंडू म्हणजे आठव्या ओव्हरचा शेवटचा चेंडू क्रॉस सीममधून टाकला. चेंडू खाली राहिला आणि शफीक पायचित झाला. शफिकने 24 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 20 धावांची खेळी केली.

यानंतर 13व्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इमामने बॅकवर्ड पॉइंटवर चौकार मारला. यामुळे हार्दिक खूप नाराज झाला. यानंतर, पुढच्या चेंडूवर धाव घेण्यापूर्वी, हार्दिक चेंडू दोन्ही हातात धरून चेहऱ्याजवळ आणून चेंडूकडे पाहत काहीतरी बोलत असल्याचे दिसले. याच चेंडूवर इमामला यष्टिरक्षक केएल राहुलने झेलबाद केले.

पहिल्या चेंडूवर हार्दिकची प्रतिक्रिया आणि पुढच्याच चेंडूवर विकेट याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही यूजर्सने लिहिले- हार्दिक मंत्र पठण करत आहे. त्याने जादू केली आणि इमाम बाद झाला. इमामने 38 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. इमाम पॅव्हेलियनमध्ये परतत असताना हार्दिकने त्याला चिडवले आणि बाय-बाय असा इशाराही केला.

महत्वाच्या बातम्या-

महिलांनो रस्त्यावर उतरा,सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका ; शरद पवारांचा सल्ला

उबाठा गटाने दादाजी भुसे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘अंधारा’त तीर मारण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रे

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा