Uday Samant Car Attack | उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक, प्रचारासभेला जाताना घडली घटना

Uday Samant Car Attack | लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीदरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. वाशिम-यवतमाळ महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी जात असताना वाटेत अज्ञातांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक केली. सुदैवाने उदय सामंत या गाडीत नव्हते. या दगडफेकीत (Uday Samant Car Attack) कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळमध्ये सभेसाठी आले आहेत. फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंतही आहेत. मात्र राळेगावमधील प्रचारसभेवेळी अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावून उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणीही जखमी झालेले नसले तरी दगडफेक नेमकी कुणी केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन