‘ब्रिजभूषण सिंह यांनी केवळ राज यांचाच नव्हे, तर एकप्रकारे मराठी लोकांचाच अपमान केला आहे’

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असताना भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह (BJP’s Kaisarganj MP Brijbhushan Singh) यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे (BJP) नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे.

राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही, माफी मागितली नाही तर मी वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत. असं चिथावणीखोर वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवरजेष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Journalist Hemant Desai) यांनी केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, हिंदू जननायक (Hindu Jananayaka) आणि खास करून मराठीहृदयसम्राट (Marathi Heart Emperor) राज ठाकरे यांना ‘चूहा’ असे संबोधून, भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केवळ राज यांचाच नव्हे, तर एकप्रकारे मराठी लोकांचाच अपमान केला आहे… याबद्दल सिंग यांनी माफी मागावी, अशी मागणी मनसे आणि राज यांचे अलीकडे गुणसंकीर्तन करणारे भाजप नेते करणार आहेत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.