Varanasi Cricket Stadium: डमरू, त्रिशूळ आणि बेलपत्राच्या आकारात बनवले जाणार वारासणी क्रिकेट स्टेडियम

Varanasi Cricket Stadium: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते वाराणसीतील गंजरी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची (Varanasi Stadium) पायाभरणी करण्यात आली. हे स्टेडियम 450 कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे. 30 एकर जागेवर बनवले जाणारे क्रिकेट स्टेडियम खूप खास आहे. हे स्टेडियम स्वतः महादेवाला समर्पित असल्याचे पीएम मोदींनी सांगितले. त्याच्या डिझाइनमध्ये छतापासून फ्लडलाइट्स आणि मंडपांपर्यंत सर्वत्र काशी शहर आणि महादेवाशी संबंधित गोष्टींची झलक पाहायला मिळेल.

या स्टेडियमचा एक भाग महादेवाच्या डमरुच्या आकारात असेल. पायाभरणीनंतर पंतप्रधान म्हणाले की, हे स्टेडियम पूर्णपणे भगवान शिवाला (Bhagvan Shiva) समर्पित असेल.

या स्टेडियमचे फ्लडलाइट त्रिशूळाच्या आकारात असतील. स्टेडियमच्या पायाभरणीपूर्वी पीएम मोदींच्या अकाऊंटवरून स्टेडियमचे अनेक अॅनिमेटेड फोटो शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये स्टेडियम कसे दिसेल हे दाखवण्यात आले होते. स्टेडियमच्या सजावटीसाठी बेलपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे वापरले जातात. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केले जाते.

एआयच्या मदतीने तयार केलेल्या चित्रांमध्ये सामना पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक त्यांच्या गाड्या कुठे पार्क करू शकतील आणि स्टेडियम बाहेरून कसे दिसेल हे देखील दर्शविते. या स्टेडियमचे छत सर्वत्र एकसारखे असणार नाही. चंद्रकोराच्या आकाराच्या टेरेसवरून मैदानाचे दृश्य संध्याकाळी खूप सुंदर असेल. हे AI च्या मदतीने तयार केलेल्या चित्रांमध्ये देखील दिसून येते.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’