राणेंचे वय झाले आहे, त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा; काँग्रेसची टीका

Narayan Rane:- अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. रामललाच्या अभिषेक कार्यक्रमात शंकराचार्यांनी सहभाग न घेतल्याचा मुद्दाही देशात गाजत आहे. मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये भूत, प्रेत सामावण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. शकराचार्यांनीदेखील याबाबत भाष्य केलं. यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांना फटकारले आहे.

“शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? म्हणजे शंकराचार्य आमच्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नाहीय तर धार्मिकतेने होत आहे. राम आमचं दैवत आहेत. त्यासाठीच हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यातील हिंदू धर्मासाठी असलेले योगदान सांगावं. जे रामांनी हिंदू धर्माला योगदान दिलं तसं शंकराचार्यांनी सांगावं”, असं नारायण राणे म्हणाले.

या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू होताच नारायण राणेंनी संध्याकाळी आपण असे म्हटले नसल्याचा दावा केला. पत्रकारांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याने त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शंकराचार्यांवर तोंडसुख घेणारे नारायण राणेंसारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदू धर्माला कलंक आहेत. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या श्रीमान नारायण राणेंचे तरी योगदान काय? राणेंचे वय पाहता आता त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा, असा सल्ला अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार