ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

Orry And Tripti Dimri Viral Video:- ‘एनिमल’ रिलीज झाल्यानंतर अचानक चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचे नाव तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आहे. कदाचित तृप्तीलाही अगदी छोट्या पात्रासाठी इतकी प्रसिद्धी मिळेल याचा अंदाजही आला नसेल. सध्या चाहत्यांनी तृत्पीला डोक्यावर घेतले असून तिला नॅशनल क्रश 2 बनवण्यात आले आहे. तसेच तिची तुलना रश्मिकासोबत केली जात आहे. पण तृप्ती सध्या तिच्या लेटेस्ट व्हिडिओंमुळे चर्चेत आहे. वास्तविक ती रॅम्पवर आग लावताना दिसली आहे.

तृप्तीला समोरून पूर्ण कट केलेला ड्रेस घालून रॅम्पवर चालताना पाहून तुमच्या डोळ्यांच्या पापण्या लवणार नाहीत. फायरफ्लाय कलरच्या या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. याशिवाय तिने अनेक प्रकारे पोज दिल्या आहेत. या इव्हेंटवेळी ती ओरीसोबतही दिसली.

AJIO Luxe Weekend या इव्हेंटला तृप्ती आणि ओरीनं हजेरी लावली. यावेळी ओरी हा  ब्लू डेनिम पँट आणि ऑरेंज टीशर्ट अशा लूकमध्ये दिसला. ओरी आणि तृप्तीनं फोटोसाठी एकत्र पोज दिल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसले की, ओरी हा तृप्तीला मिठी मारतो त्यानंतर तो तिच्या गालावर किस करतो.

ओरी आणि तृप्तीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्यानं व्हिडीओला कमेंट केली, बॉलिवूडमधील अनेक जण ओरीचे फॅन्स आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ नका असं का म्हणाले होते नेहरू?

3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

राम मंदिराबाबत लालकृष्ण अडवाणींचे महत्त्वाचे विधान, ‘नियतीने ठरवले होते…’