जळगाव : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्याकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे, अशा सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे आकारणे (घेणे) बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक परवानाधारक ऑटो रिक्षाला मोटर वाहन नियमान्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधणकारक असून ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य आहे. ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.
सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑटोरिक्षा फेअरमीटर प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटर प्रमाणे भाडे घ्यावे अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील, तर नागरिकांनी अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2261819 किंवा [email protected] या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी म्हटले आहे.
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0