हरभरा बियाणाचे अनुदानित दराने वितरण, शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड :– शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन धारणे एवढे किंवा 2 हेक्टरपर्यंत प्रती एकर 30 किलो हरभरा बियाणे देण्यात येईल. शेतकऱ्यांने सातबारा, 8- अ च्या झेरॉक्स प्रत घेऊन वितरकाकडे जाऊन अनुदानावरचे बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य 2021-22 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण (दहा वर्षा आतील वाण) या घटाअंतर्गत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम व कृषक भारती को.ऑप या बियाणे वितरण संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. हे बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकाकडे उपलब्ध करण्यात आले आहे.

बियाणे वितरण संस्था, वाण, उपलब्ध पॅकिंग साईज, विक्री किंमत, अनुदान रक्कम, अनुदान वजा जाता शेतकऱ्यांनी अदा करावयाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळतर्गत वाण हे विक्रांत, फुले विक्रम, फुले राजविजय, AKG 1109 तर उपलब्ध पॅकिंग साईज 20 कि.ग्र असेल. बॅगची विक्री किंमत 1 हजार 720 तर अनुदान पाचशे रुपये असून अनुदान वजा जाता शेतकऱ्यांनी अदा करावयाची रक्कम 1 हजार 220 अशी आहे. राष्ट्रीय बीज निगम अंतर्गत वाण राजविजय (RVG-202 तर उपलब्ध पॅकिंग साईज 30 कि.ग्रॅ ची बॅग आहे. त्यांची विक्री किंमत 2 हजार 580 असून अनुदान रक्कम सातशे पन्नास आहे.

अनुदान वजा जाता शेतकऱ्यांनी अदा करावयाची रक्कम 1 हजार 830 आहे. बियाणे वितरण संस्था कृषक भारती को.ऑप.अंतर्गत वाण राजविजय (RVG-202) असून उपलब्ध पॅकिंग साईज 30 कि.ग्रॅ बॅग आहे. विक्री किंमत 2 हजार 580 असून अनुदानाची रक्कम 750 आहे. अनुदान वजा जाता शेतकऱ्यांनी अदा करावयाची रक्कम रुपये 1 हजार 830 असणार आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अनुदानीत हरभरा बियाणाचा लाभ घ्यावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपपत्रकाद्वारे कळविले आहे.

हे देखील पहा