Gautam Gambhir | गौतम गंभीर पंचांशी मैदानात का भिडला; व्हिडिओमध्ये पाहा असं नेमकं घडलं तरी काय…

Gautam Gambhir | एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात रविवारी खेळला गेलेला आयपीएलचा सामना जोरदार वादावादीसह संपला. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात पंचांना दिग्गजांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रथम विराट कोहली त्याच्या बाद करण्यावरून पंचांशी भांडला, त्यानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि यजमान संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी पंचांशी वाद घातला. उभय संघांमध्ये खेळलेला हा सामना चर्चेत राहिला.

ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात केकेआरने आरसीबीचा एका धावेने पराभव केला. या सामन्यात विराट कोहली पंचांच्या निर्णयावर नाराज दिसला. वास्तविक, लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली आणि डुप्लेसिसने आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, हर्षित राणाच्या गोलंदाजीवर कोहलीने आपली विकेट गमावली. कोहलीने रिव्ह्यू घेतला, पण अंपायरने त्याला बाद घोषित केले. आता यावरून वाद निर्माण झाला आहे. याच सामन्यात कोलकाताचे मेंटॉर आणि प्रशिक्षक खेळाडूच्या बदलीबाबत पंचांशी वाद घालताना दिसले.

का झाला गंभीरचा पंचांशी भांडण?
आरसीबीच्या डावाच्या 19व्या षटकात गौतम गंभीर आणि चंद्रकांत पंडित चौथ्या पंचांशी वाद घालताना ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, KKR संघाला सुनील नरेनच्या जागी शेवटच्या दोन षटकांमध्ये रहमानउल्ला गुरबाजने क्षेत्ररक्षण करायचे होते. खरंतर, यश दयालच्या चेंडूवर दुसऱ्याच षटकात नरेनला दुखापत झाली. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला क्षेत्ररक्षण करण्यात अडचण येत होती. मात्र, चौथ्या पंचांनी त्याला तसे करण्यास परवानगी दिली नाही, त्यानंतर संघ व्यवस्थापन सदस्यांनी त्याच्याशी जोरदार वादावादी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका