Ajit Pawar | अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला, कन्हेरीच्या मारुती मंदिरातून केला प्रारंभ

Ajit Pawar  | पवार कुटुंबासाठी बारामती लोकसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली असून त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. बारामतीत महायुतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) आणि महाविकास आघाडीतून खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) अशी लढत होणार आहे. दरम्यान अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. १९६७ पासून आतापर्यंत पवार कुटुंबियातला कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील कन्हेरी इथल्या मारुती मंदिरातून होतो.

आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी अजित पवारांचा (Ajit Pawar ) मुलगा जय पवार आणि अजित पवारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यातच अजित पवारांनी आणि सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठं शक्ती प्रदर्शन केले आणि त्यानंतर आज अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी ‘मी बारामतीची सून, बारामतीकरांचे फेडेन ऋण’ त्यामुळे घड्याळाला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा