जिल्हाप्रमुख पद हवं त्यांनी गद्दारांच्या गाड्या फोडा,त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करू – बबनराव थोरात

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दोन्ही बाजूंनी आमचीच खरी शिवसेना आहे असा दावा केला जात आहे. यातच आता या दोन्ही गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल, असे आवाहन हिंगोली शिवसेनेचे नेते बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी केलंय.

एका मेळाव्यात बोलताना नवनिर्वाचित संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी ज्यांना जिल्हाप्रमुख पद हवं त्यांनी गद्दारांच्या गाड्या फोडा त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल असं आवाहन करीत खळबळ उडवून दिली. यावेळी संदेश देशमुख यांनी आमदार बांगर ,खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार गद्दार अश्या घोषणा दिल्या.

संतोष बांगर आता माझ्या कानाखाली आवाज काढा …. एक वेळ नाही तर हजार वेळ गद्दार म्हणतो.. असे म्हणत संदेश देशमुख यांनी जोरदार घोषणा देत बांगर यांना आव्हान दिले. या सर्व प्रकारामुळे दोन्ही गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.