संजय राऊत बॉम्ब फोडणार होते परंतु…, नवनीत राणांचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. खासदार किरीट सोमय्या ते इडी अशा अनेक मुद्यांवर संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर आरोप केले. यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टिकाटिप्पणी केली. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.

बाळासाहेब ठाकरे आज जर असते तर ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी शक्तिप्रदर्शन केले आहे, त्याची गरज पडली नसती. तसेच त्यांना आम्हीच खरे शिवसैनिक, शिवभक्त असल्याचं बोलण्याची गरज भासली नसती. जे आतमधूनही कमजोर झाले आहेत आणि बोलताना त्यांच्या शब्दांमधून दिसुन येत आहे. हे खुप दुर्दैवी आहे असंही नवनवीत राणा म्हणाल्या.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, या प्रकरणामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी नक्कीच होणार. तसेच अनेक खासदार, आमदारांची त्याठिकाणी गैरहजर होते. ज्यांच्या सोबत हे घडत आहेत. जे नेते या प्रकरणात दोषी होते. तेच नेते त्याठिकाणी आले होते. त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्या साडेतीन लोकांची देखील त्यांनी नावे सांगितली नाही. बॉम्ब फोडणार होते. परंतु फुसका बॉम्ब देखील त्यांनी फोडला नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसेना भवन याठिकाणी येण्यासाठी आव्हान केले होते. त्यांच्या या आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर गर्दी केली होती. त्या सगळ्यांना पत्रकार परिषद बघता येईल याठिकाणी शिवसेना भवनासमोर एलइडी लावण्यात आली होती.