बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधी केला नाही – उद्धव ठाकरे

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. हिंदुत्व, काश्मिरी पंडित,बाबरी, महागाई, पाणीप्रश्न आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधी केला नाही. दुसऱ्या धर्मांचा आदर करणे ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण आहे. प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवावा. घराबाहेर पडताना देश हाच आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे.

नामर्दांच हिंदूत्व तुम्ही आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या उपस्थित केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले वचन आहे. ते मी कधीही विसरणार नाही ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या शहराचे जेव्हा नामांतर करेल पण या संभाजी महाराजांनी देखील आदर्श वाटेल असेल नगर मी करणार आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.