… तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील – उद्धव ठाकरे

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. हिंदुत्व, काश्मिरी पंडित,बाबरी, महागाई, पाणीप्रश्न आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. असं ठाकरे म्हणाले.

आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. त्यामुळे मला या सैनिकांची शक्तीही तिकडे वाया घालवायची नाही असं म्हणत विरोधकांना टोला लगावला.

मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील असं मुख्यमंत्री म्हणाले.