बेरोजगारीवर मात करण्यासाठी तरुणाने लढविली जबरदस्त शक्कल

कोरोना माहामारी आली आणि आपल्याला जगण्याची एक वेगळी पद्धत दाखवून दिली. कोरोना काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. उच्चशिक्षित तरुण देखील बेरोजगार झाले आहेत. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल, केळी घ्या 20 रुपये डझन असे म्हणत हा तरुण लोकांना केळी विकत घेण्यासाठी आकर्षित करत आहे. हा तरुण पुण्यातील दिघी परिसरात राहणारा आहे.त्यांचे नाव नामदेव माने आहे.

नामदेव दिघी परिसरात एका कंपनीत काम करत होता. पण पहिल्या लॉकडाऊन काळात त्याला त्यांची नोकरी गमवावी लागली. या कारणांमुळे तो हताश न होता नवीन काहीतरी करण्याच्या जिद्दीने करण्याचा प्रयत्न नामदेव याने केला आहे. नामदेवने मागील लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर केळी विकण्यास सुरुवात केली पण कोणी त्यांच्याकडून कोणीच केळी विकत घेत नसे. पण त्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केळी घेऊन नृत्य करण्यास सुरुवात केली.

त्यांचे नृत्य काहीना पटेल नाही. पोलिसांनी त्याला समज दिली आणि सोडून दिले. नामदेवने केळीचे एक गाणे स्वताच्या आवाजात रेकॉर्ड केले आणि गळ्यात केळीचा भाव असलेली पाटी अडकवून नामदेव केळी विकू लागला. आता देखील विकतो. आता त्यांचा चांगला व्यवसाय होतो. दिवसाकाठी त्याला 400 रुपये मिळतात.नामदेव म्हणतो आता पुन्हा लॉक डाऊन होऊ नये. कारण आधीच्या लॉक डाऊनने अनेक गोष्टी शिकवल्या आहेत.नामदेवचे अनेक विडियो सध्या सोशल मिडियावर व्हायरलं होत आहेत. त्यामुळे नामदेव सध्या पुण्यात आणि एकूणच राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

तीन वर्षांपासून कोरोना महामारी जगभर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या केल्या आहेत. आणि अनेकांनी आपले जीव देखील दिले पण नामदेव मात्र स्वता काम करून कष्ट करून चार पैसे कमवतात हे महत्वाचे आहे.