जय शहाचा आदेश न ऐकणाऱ्या इशान किशन आणि श्रेयस अय्यरला बीसीसीआय एकाचवेळी तगडा हादरा देणार!

BCCI – भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना रणजी ट्रॉफीमध्ये न खेळणे महागात पडू शकते. एका अहवालानुसार, बीसीसीआय (BCCI) या दोन खेळाडूंना रणजीमध्ये न खेळल्यास केंद्रीय करारातून वगळू शकते. मुंबईच्या श्रेयस अय्यरचा बी ग्रेडचा करार आहे, तर इशानचा सी ग्रेड आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी केंद्रीय करार असलेल्या आणि भारत ‘अ’ संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग न घेतल्यामुळे इशारा दिला होता. रणजी ट्रॉफीमध्ये प्रत्येकाला खेळणे बंधनकारक असल्याचे शाह म्हणाले होते. अहवालानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडकर्त्यांनी 2023-24 हंगामासाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी तयार केली आहे आणि ती लवकरच जाहीर केली जाईल.

दोन्ही खेळाडू त्यांचे करार गमावू शकतात
देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे इशान आणि श्रेयस यांना या यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. इशान किशन भारताकडून अखेरचा नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत खेळला होता. गेल्या वर्षी त्याने वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. या काळात, तो रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या घरच्या संघ झारखंडसाठी खेळला नाही आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत बडोद्यात सराव केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

श्रेयस फिट घोषित!
त्याचवेळी श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठीही संघातून वगळण्यात आले होते. नुकतेच श्रेयसने पाठदुखीचे कारण देत रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत मुंबईकडून खेळण्यास नकार दिला होता, परंतु एनसीएने सांगितले की श्रेयसला कोणतीही दुखापत नाही आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?