मशिदीवरील भोंग्यांचे संरक्षण रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक करणार – रामदास आठवले

मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( Mumbai Municipal Corporation Election ) पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि  राष्ट्रवादी ( BJP, MNS and NCP ) च्या मोठ्या जाहीर सभा नुकत्याच पार पडल्या असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करीत असताना आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athavale ) यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष ( Republican side ) ही ऍक्टिव्ह मोड मध्ये आला आहे. उद्या दि.4 मे रोजी मशिदीवरील भोंगे ( The horn on the mosque ) कोणी जबरदस्ती उतरविण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक ( Bhimsainik ) पुढे उभे राहतील. संविधानाचे राज्य असून इथे कुणाचे दादागिरी आम्ही चालू देणार नाही असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला असून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दि.3 मे रोजी ईद असल्यामुके भोंग्यांना हात लावणार नाही मात्र 4 मे ला भोंगे काढणार असल्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधान विरोधी असल्याचे सांगत  रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करील. पोलिसांनी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे असे  रामदास आठवले यांनी आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी ईशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील काही व्यक्ती भडकाऊ उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका कोणीही घेऊ नये असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. समाजात शांतता बंधुता सौहार्द टिकविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा सदैव पुढाकार राहिला असून भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकेला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मौदानात असून कातडी बाचाऊ कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षात स्थान मिळणार नाही.रिपब्लिकन पक्ष हा संघर्षशील आक्रमक क्रांती करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे याची प्रचिती दाखवा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.