लज्जास्पद! भाजप कार्यकर्त्याकडून आदिवासी तरुणाच्या अंगावर लघुशंका, व्हिडिओ व्हायरल

भोपाल : मध्य प्रदेशमध्ये सीधी जिल्ह्यातील भाजप नेता प्रवेश शुक्ला (Pravesh Shukla) याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नशेच्या अवस्थेत तो एका आदिवासी तरुणावर (Pravesh Shukla Viral Video) लघवी करत आहे. हे प्रकरण समोर येताच भाजपने प्रवेश शुक्लावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपींवर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रवेश शुक्ला हे भाजपचे आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी आहे. त्याचा हा व्हिडिओ 9 दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सिधी जिल्ह्यातील कुबरी बाजारचा आहे. येथे एक आदिवासी तरुण बसला होता. प्रवेश शुक्ला याने नशेच्या अवस्थेत त्या आदिवासी तरुणावर लघवी केली. कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. प्रवेश शुक्लांच्या या लाजिरवाण्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत दोषीला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोषीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.