राज ठाकरेंनी केलेली टीका पवारांना झोंबली; म्हणाले, त्यांच्या ताेंडाला…

कोल्हापूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन काल करण्यात आले होते . यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

जातीवादाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला गेला’, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलाय.

दरम्यान, राज यांनी केलेली टीका शरद पवारांना चांगलीच झोंबली आहे. राज ठाकरे यांच्याकडे आकडे मर्यादित आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आकडे आहेत. त्यामुळे त्यांना लोकांचा प्रतिसाद किती आहे ते कळते. राज ठाकरे काहीही बोलू शकतात असा टाेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काेल्हापूरात (kolhapur) माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंना लगावला. (sharad pawar latest marathi news)

उत्तरप्रदेशात योगींच्या राज्यात लखमीपूर घटनेसारख्या घटना घडल्या होत्या. असे सरकार ठाकरेंना पाहिजे असेल तर काही इलाज नाही. महाराष्ट्रात उध्दव ठाकरेंच्या (uddhav thackeray) नेतृत्वखालील सरकारमध्ये अस होऊ दिल जाणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले. सामाजिक ऐक्य बिघडावं असे वक्तव्य सातत्याने हाेऊ लागली आहेत. जाती पातीचे राजकारण काेण करीत आहेत हे सर्वांना माहित आहेत. ते एखादे व्याख्यान देतात आणि चार सहा महिने निघून जातात. कूठे असतात. काेणाला माहित नसते. त्यांच्या ताेंडाला काेणी लगाम लावू शकत नाही असा टाेलाही पवारांनी मारला.