मी त्याला जोराने कानाखाली मारेन; भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूवर भडकले कपिल देव

भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या अचानकपणे एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भारतीय संघाच्या एका खेळाडूवर कपिल देव अचानक भडकले आहेत. कपिल देव यांनी तर मी जाऊन त्याला जोरदार चपराक मारीन असे म्हटले आहे. कपिल देव यांच्या या वक्तव्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. १९८३चे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याबद्दल हे मोठे विधान (Kapil Dev Statement) केले आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

ABP Uncut वर बोलताना कपिल देव म्हणाले, ‘ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल, तेव्हा मी जाऊन त्याला जोरदार कानाखाली देईन. कारण क्रिकेटपटूंनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. बघा, त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे संपूर्ण संयोजन खराब केले आहे. मग असा संतापही होतो की, आजकालची तरुण मुलं अशा चुका का करतात? म्हणूनच त्याच्यासाठीही मी त्याला एक थप्पड मारेन.’

दरम्यान ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ऋषभ पंत कार अपघाताचा बळी ठरला होता. तो नवी दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता आणि त्याची मर्सिडीज कार चालवत होता. डेहराडून हायवेवर ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली आणि कारला आग लागली. २५ वर्षीय ऋषभ पंतच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे, गुडघ्याचा लिगामेंट फाटला आहे, तसेच उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. ऋषभ पंत आता हळूहळू दुखापतीतून सावरत आहे.