राष्ट्रवादीला मोठा धक्का; हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘टांगा पलटी’

Pune – पुणे जिल्ह्यातील एकंदर 9 बाजार समित्यांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत हवेली वगळता उर्वरित आठही ठिकाणी स्थानिक आमदारांनी आपापल्या पक्षाचं बाजार समितीवरील वर्चस्व सिद्ध केलं आहे. हवेलीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला धक्का बसला असून तिथं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि नाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पॅनेल विजयी झालं आहे.

भोर मध्ये काँग्रेसच्या पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं तर बारामती, आंबेगाव, मावळ आणि खेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. इंदापूरमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे ,तर दौंड मध्ये स्थानिक आमदार राहुल कुल यांचं पॅनेल विजयी झाल्याचं दिसून आलं.
पुणे-कृषि-उत्पन्न

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हमाल मापाडी मतदार संघातून संतोष नांगरे विजयी झाले. निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे दोन आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्वपक्षीय पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.