Big Breaking : रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई : धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यभरात महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आवाज बुलंद करणाऱ्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने पक्षाच्या पदाची सूत्रे त्यांनी सोडली असल्याचे सांगण्यात आले.

चाकणकर यांनी पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. यावेळी त्यांनी उत्तम कामगिरी पार पडल्याने त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. पुढे राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्याने तेथे चाकणकर यांना संधी मिळाली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. हे पद अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहावे का, अशी नेहमीच चर्चा असते. त्यांनी आता संघटनेचे पद सोडले आहे.