निम्म्या किमतीत कृषी यंत्रे खरेदी करण्याची मोठी संधी, सरकार देणार बंपर सबसिडी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Govt Scheme : हरियाणा सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या उद्देशाने एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकार कृषी यंत्रीकरण योजनेंतर्गत आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शेतीचे काम सुलभ करत आहे . या योजनेअंतर्गत कृषी यंत्राच्या खरेदीवर ५० ते ८०% अनुदान उपलब्ध आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतीची कामे करता येतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रे स्वस्तात खरेदी करून त्यांचे उत्पन्न वाढवता येणार आहे.हरियाणा सरकार कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यंत्रांच्या खरेदीवर ५० ते ८० टक्के अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळेल. तर FPO आणि कस्टम हायरिंग सेंटर्सना ८० सबसिडी दिली जाईल.