पूजा चव्हाण प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांचीही मंत्री मंडळात वर्णी 

मुंबई : आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडला यात टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही सत्तारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आमदार संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते त्यांची देखील या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागली आहे.

विशेष म्हणजे पूजा चव्हाण या तरूणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार  तब्बल 39 दिवस रखडला होता अखेर आता आज या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे.

शिंदे गटातील मंत्री – तानाजी सावंत,उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार,  दीपक केसरकर ,शंभूराज देसाई,संजय राठोड,गुलाबराव पाटील

भाजपकडून मंत्री – गिरीश महाजन,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण,विजयकुमार गावित,मंगलप्रभात लोढा