MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena MLA Disqualification Case Verdict  : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. पण आता याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला आहे. पक्ष हा बहुमताच्या आधारे ठरवला जातो आणि बहुमत हे शिंदे गटाकडे आहे असंही नार्वेकर म्हणाले. तर भरत गोगावले यांचाच व्हिप योग्य असल्याचा निकालही त्यांनी दिला.

दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर करताच राज्यभरातून शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राहुल नार्वेकर यांनी निर्णय जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जात आहे. राज्यभरात विविध ठिकाणी कार्यकर्ते एकत्र जमल्याचे चित्र आहे. फटाके फोडत, पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना शिंदे गट दिसत आहे तर दुसरीकडे ठाकरे गट निर्णयाने झाल्याचे दिसून येत आहे. आमदार अपात्रता निर्णयाचा ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.