“बाळासाहेबांनी राज आणि उद्धव यांना एकत्र आणायला सांगितले होते, पण…”, नितीन गडकरींचा दावा

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बंधू एकत्र येणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा, असे बाळासाहेबांनी आपल्याला सांगितल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरेंवर (Balasaheb Thackeray) लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये समेट घडवून आणण्यास सांगितले होते. त्यावेळी मी बरेच प्रयत्न केले होते. पण मला त्यात अपयश आले, असा खुलासा करत नितीन गडकरी यांनी एकप्रकारे उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे अवघड असल्याचे संकेत दिले आहेत.