‘शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं’, नारायण राणे यांचं आव्हान

Narayan Rane:- अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. रामललाच्या अभिषेक कार्यक्रमात शंकराचार्यांनी सहभाग न घेतल्याचा मुद्दाही देशात गाजत आहे. मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये भूत, प्रेत सामावण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. शकराचार्यांनीदेखील याबाबत भाष्य केलं. यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांना फटकारले आहे.

“शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? म्हणजे शंकराचार्य आमच्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नाहीय तर धार्मिकतेने होत आहे. राम आमचं दैवत आहेत. त्यासाठीच हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यातील हिंदू धर्मासाठी असलेले योगदान सांगावं. जे रामांनी हिंदू धर्माला योगदान दिलं तसं शंकराचार्यांनी सांगावं”, असं नारायण राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ नका असं का म्हणाले होते नेहरू?

3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

राम मंदिराबाबत लालकृष्ण अडवाणींचे महत्त्वाचे विधान, ‘नियतीने ठरवले होते…’