मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेशी दौऱ्यांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च, रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar- महाराष्ट्रातील राज्य सरकारकडून मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेशी दौऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी हजार रुपये परीक्षा फी घेण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) ओएसडीच्या अनेक कंपन्या असून, त्यांच्या संबधित कंपन्यांना परीक्षेचे कामं मिळत आहेत. तसेच फडणवीसांच्या ओएसडीच्या एका विदेशी दौऱ्यावर १ कोटी ८८ लाखांचा खर्च झाला आहे. असा हल्लाबोल राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेमधून केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, २३ नोव्हेंबर २०२३ ला आम्ही एमआयडीसीकडे काही माहिती मागवली होती. यामधे विदेशात कोण-कोणते प्रवास झाले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवण्यात आली. ३२ लाख रुपये खर्च झाला. आत्तापर्यंत ४२ ते ४५ कोटी रुपये वेगवेगळ्या विदेशी दौऱ्यावर खर्च झाला आहे. तैवान देशात मंत्रीमोहदय गेले नव्हते केवळ अधिकारी तिथं गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते. यासाठी १ कोटी ८८ लाख रुपये खर्च झाला. इतका खर्च कसा काय झाला? तुम्हीं प्राईव्हेट जेटने गेले होते का? कारण ५ लोकांवर ६० लाख रुपये कसा काय केला? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, यु एस मध्ये गेल्यानंतर प्रेसिडेन्शियल स्वीट जिथे यूएसचे प्रेसिडेंट किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात अशा काही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही राहिलेत का ? तिथे तुम्हाला सोन्याचा चमचा आणि ताट यामध्ये जेवण वाढण्यात आले होते का ? आणि तो सोन्याचा चमचा परत भारतात घेऊन यायला तुम्हाला परवानगी दिली होती का ? कारण दिवसाला ६० लाख खर्च मंत्री नसताना तिथे होत असेल आणि त्या दौऱ्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही आणि ढवसे नावाची व्यक्ती तिथे का गेली ? असा प्रश्न देखील यावेळी रोहित पवार यांनी विचारला आहे.

पुढे रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसीला अधिकचा तपशील मागवला आहे. तैवान येथे एक भारतीय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला थेट पैसा देण्यात आला. ८ महिन्यांपूर्वी यांनी जो खर्च केला तो कसा दाखवायचा असा प्रश्न आता यांच्या समोर उभा राहिला आहे. यांनी आता मागच्या तारखेचे पत्र देऊन खर्च दाखवण्याचा प्रयत्न कौस्तुभ ढवसे करत आहे. जपानला देवेंद्र फडणवीस गेले, तिथं खर्च एमआयडीसीने केला होता. तिथं देखील कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते याचं उत्तर द्यावं? असेही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, सरकारने परदेशात जाऊन केवळ ५० लाखांचे एमओयू केले आहेत हे गंभीर आहे. मग हे परदेशात गेले कशाला. कौस्तुभ ढवसे यांच्या अनेक कंपन्या आहेत. असा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा ओएसडी झाला कसा काय? याचाच मित्र आयटी घोटाळ्याचा आरोपी आहे. ज्या कंपनीला कंत्राट दिलं होत त्याचा डायरेक्टर कौस्तुभ ढवसे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करतो. याचा अर्थ त्यांचा याच्याशी संबंध आहे. कारण देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना हा व्यक्ती त्यांच्या सोबत होता. त्यानंतर सत्ता गेली की हा व्यक्ती गायप झाला आणि आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आले की पुन्हा कौस्तुभ ढवसे त्यांचा ओएसडी झाला आहे.

रोहित पवार म्हणाले की, लंडनमध्ये देखील यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. उदय सामंत जर्मनीला गेले होते. तिथं एका कंपनीने अश्र्वासन दिले की, आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहोत, मात्र प्रत्यक्षात कोणताही करार झालेला नाही. पुन्हा एकदा डाओसला सगळे नेते जाणार आहेत. या दौऱ्याला एक व्यक्ती जाणार आहे. जो आत्ता सतेत नाही. परंतू तो दौऱ्याला जाणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे एका प्रवासासाठी ३० लाख रुपये खर्च करतात. जो व्यक्ती संबंधित खात्याशी संबंधित देखील नाही, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, तलाटी भरतीत भ्रष्टाचार झाला आहे. असे आम्ही सांगितलं आणि आम्ही हा मुद्दा मांडला. एका पत्रकाराने ही बातमी दिली, ती बातमी एफआयअरच्या आधारे दिली होती. तरीदेखील देवेंद्र फडणवीस हे त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करू असं म्हणतात. नाशिक, सांगली, श्रीगोंदा येथे पेपरफुटी झाली. ज्याने पेपर फोडला तो पोलीस अधिकारी आहे. भाजप काळात जी भरती झाली त्या भरतीमध्ये हा व्यक्ती पोलीस झाला आणि आता त्याची बायको तलाठी झाली आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तीला सारखे मार्क मिळाले आहेत. जे कर्मचारी टीसीएसमध्ये काम करतात त्यांच्या कुटुंबातील मुलांना चांगले मार्क मिळाले आहेत हे कसं काय शक्य आहे? अनेक ठिकाणीं मास कॉपी देखील झाली आहे. आयटी घोटाळ्यातील व्यक्ती आता सरकारमध्ये ओएसडी आहे. सरकार गेले त्यावेळीं ही व्यक्ती परदेशात होती. आता पुन्हा ही व्यक्ती सत्तेत सहभागी होऊन काम करत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, युवा संघर्ष यात्रेदरम्यान सर्वसामान्य नागरिक व युवा वर्गाने उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे काय मत आहे. यासंबंधीचे पत्र आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहे. त्या पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा आम्ही करत आहे. तलाठी भरतीमध्ये १३० कोटी रुपये हे गोळा केले गेले त्यामध्ये १० लाखांहून अधिक मुलांनी तिथे फॉर्म भरलेले होते पण त्यामध्ये बऱ्याच मुलांना लांबचे सेंटर हे मुद्दामून दिले गेले, त्यामुळे फक्त साडेआठ लाख मुलांनी त्या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आणि या भरती प्रक्रियेचा पेपर फोडणारा व्यक्ती हा पोलीस असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

राज्याच्या मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर कोट्यावधींचा खर्च केल्या जात असल्याचे रिपोर्ट हा आमच्याकडे आहे. त्यातून काय सिद्ध झाले हे आपण सर्वांनी पाहिलेलेच आहे. तर मग या सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून सरकारी परीक्षांसाठी एवढी फी का आकारली जात आहे ? तलाठी भरती परीक्षेत झालेला घोटाळा आणि त्यावर सरकारचे काहीच न केलेले फक्त वेळ हे सर्व काही सांगून जाते असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ५ लाख तरुणांना नोकरीच्या संधी मिळणार होत्या ते सर्व प्रकल्प गुजरातला नेले गेले. राज्यातले सरकार हे गुजरातच्या मदतीचे सरकार आहे असे म्हणायला हरकत नाही. केंद्रातले मोठ-मोठे नेते हे गुजरातला प्रकल्पांसाठी इन्व्हेस्टमेंट करत असल्याचे चित्र सर्वांच्या समोर आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी कालच वक्तव्य केलं की, गुजरात हे देशातले विकासाचे इंजिन आहे. कॅगच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी जसं की, शासकीय पैशावर एमआयडीसीच्या पैशावर हे जे काही पर्यटन झालेले आहे त्याची इन्क्वायरी व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे करणार आहोत.

रोहित पवार म्हणाले की, सध्या देशांमध्ये कोणत्या राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही असेल तर ती सध्याच्या परिस्थितीत भाजपमध्ये आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सेतूला नाव दिले गेले याचा आम्हाला आदर आहे, परंतु काल अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा एकही फोटो दिसला नाही. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची आम्हाला कमी भासली असेही रोहित पवार म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ नका असं का म्हणाले होते नेहरू?

3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

राम मंदिराबाबत लालकृष्ण अडवाणींचे महत्त्वाचे विधान, ‘नियतीने ठरवले होते…’