सुप्रिया सुळे यांनीच मान्य केलं की पवार साहेब औरंगजेब आहेत, निलेश राणेंचा दावा

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी आल्यापासून राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून खळबळ उडाली आहे. (Death threat to Sharad Pawar) या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या तक्रारीत सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी पोस्ट सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे.

दरम्यान, आता याच सौरभच्या ट्वीटचा फोटो पोस्ट करत भाजप नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात, सुप्रिया सुळे यांनी केलेली तक्रार यामध्ये पवार साहेबांना धमकी दिली असं कुठेही दिसत नाही. सौरभ पिंपळकर याच ट्विट बघून असं दिसतंय सुप्रिया सुळे यांनीच मान्य केलं की पवार साहेब औरंगजेब आहेत. राष्ट्रवादी वाल्यांनो आता करा आंदोलन. असा खोचक सल्ला देखील राणेंनी दिला आहे.