माझी वाटचाल सांघिक; म्हापशेकर एकाधिकारशाहीला नाकारतील, जोशुआ डिसोझा यांचा पलटवार

म्हापसा : माझा विश्वास सांघिक विचारांवर आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेवून म्हापसाच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका आहे. त्यामुळे म्हापसेकर नागरिक एकाधिकाशाहीला स्पष्टपणे नाकारतील, अशी टीका भाजपाचे उमेदवार तथा आमदार जोशुआ डिसोझा यांनी केली.

गोवा विधानसभा निवडणुकीत म्हापसा विधानसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवार ज्योशुआ डिसोझा यांनी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले अंगोडचे (वॉड क्र. ९) माजी नगरसेवक रायन ब्रगान्झा यांनी ज्योशुआ यांच्यावर टीका केली होती. कोविड काळात ज्योशुआ यांनी लोकांसाठी काम केले नाही, असा निराधार आरोप केला होता.

यावर बोलताना आमदार ज्योशुआ डिसोझा म्हणाले की, रायन ब्रेगान्झा यांची बहीण केल ब्रेगान्झा यांना महिला राखीव जागेवर नगरसेविका होण्याची संधी मिळाली. त्यामुळे रायला नगरसेवक किंवा सत्तेत राहता आले नाही. आता विधानसभा निडणुकीत पुन्हा ज्योशुआला संधी मिळाली, तर पुढील १५ वर्षे रायन यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यापासून वंचित राहणार आहे. यामुळे अस्वस्थ झालेले रायन ब्रगान्झा निराधार आरोप करीत आहेत.

मात्र, कोविड काळात आम्ही सर्व नगरसेवक आणि प्रदेशा भाजपाच्या मदतीने विविध उपक्रम हाती घेतले. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी आम्ही त्याचा फायदा घेतला नाही. लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ठेवली. अडचणीच्या काळात प्रसिद्धीसाठी धडपड न करता, लोकांना मदत करीत मानवता जपण्याचा प्रयत्न केला, असा दावाही जोशुआ डिसोझा यांनी केला आहे.

कोविड काळात केलेले काम रायन विसरले…

म्हापसा मार्केटमधील सांडपाणी व्यवस्था सक्षम केली. काहीअंशी समस्या सुटली आहे. तसेच, सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने एकजुटीने नागरिकांना आरोग्य मार्गदर्शन, महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून औषध फवारणी, मास्क, सॅनिटाईझर, मोफत रुग्णवाहिका, कोविड रुग्ण आणि कुटुंबियांना मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीपीई किट, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, औषधांच्या कीट वाटप केले. म्हापशाच्या नागरिकांना लॉकडाउन काळात जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, कोविड काळात रायन ब्रगान्झा नगराध्यक्ष होते. त्यामळे अनेक उपक्रमांत प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. मग, रायन यांनी आपल्या कार्यकाळात काहीच काम केले नाही, असा अर्थ होतो. त्यामुळे रायन यांनी केवळ एकाधिकारशाहीच्या मानसिकतेतून आरोप केले आहेत. मात्र, माझी राजकीय वाटचाल ही सर्वांना सोबत घेवून आणि सांघिक (टीम वर्क) असेल, असेही आमदार जोशुआ यांनी म्हटले आहे.