Andheri East Bypoll 2022 : ऋतुजा लटके यांच्याशिवाय ठाकरे गटाकडून ‘या’ उमेदवारांना मिळू शकते उमेदवारी

Mumbai – अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात ही निवडणूक भाजपऐवजी (BJP) शिंदे गट (CM Eknath Shinde) लढण्याची शक्यता आहे. यातच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

एकीकडे लटकेंकडून उमेदवारीसाठी राजीनामा मंजूर करून घेणे महत्वाचे असल्याने यासाठी कोर्टकचेऱ्या सुरु असताना ठाकरे गटाने आता अन्य पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. त्यात लटकेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय लटके यांच्या मातोश्री आणि बंधुंच्या नावाचीही चर्चा आहे.