प्रकृती खालावल्याने भाजप आमदार लक्ष्मण जगताप रूग्णालयात

पिंपरी – चिंचवडचे (Pimpari-Chinchwad) भाजपचे (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबाबत भाजपाचे आमदार महेश लांडगे ( Mahesh Landage ) यांनी फेसबूकच्या माध्यामातून संवाद साधून प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

ते म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर  सध्या बाणेरच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत असून दोन – तीन दिवसातच ते बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळेल असे डॉक्टरांनी सांगितल्याचं महेश लांडगे यांनी सांगितले.

आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावल्या नंतर रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच त्यांच्या प्रकृती विषयी उलट – सुलट चर्चेला उधाण आलं. नुकताच जगताप यांनी अमेरिकेत उपचार घेतले होते. त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत आहे. कार्यकर्त्यांनी आहे तिथेच थांबावे असे आवाहन आमदार लांडगे यांनी केलं आहे.