खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी – पवार 

मुंबई – भाजपच्या नेत्यांनी मोहम्मद पैंगबर (Prophet Muhammad) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटलंय. अरबच्या दुतावासाने भारताला यासंदर्भात माहितील दिल्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची हकालपट्टी (BJP spokesperson Nupur Sharma fired) झाली आहे. नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

या दरम्यान आणखी एका वादाला तोंड फुटलंय.  अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो (Photo of Prime Minister Narendra Modi on garbage cans) लावण्यात आले आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकतं. अनेकांनी यासंदर्भात ट्वीट करत अरब देशांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ते म्हणतात, राजकीय विरोधक असले तरी Narendra Modi साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत.त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपच्या च्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय.तसंच आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय.हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे.

विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत.. किंबहुना त्यांच्या या ‘लाय…’मुळंच महाराष्ट्र भाजप ने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी.असं ते म्हणाले.