डॅशिंग नितीन नांदगावकरांवर शिवसेनेने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई – आपल्या हटके स्टाईलने सोशल मीडियावर प्रसिद्ध (Viral On Social Media) असलेल्या नितीन नांदगांवकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. नितीन नांदगावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. अंतर्गत गटबाजी आणि पक्षाकडून तिकीट न दिल्याने नाराज असलेल्या नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेनेने त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.

नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे शिवसेनेच्या उपनेतेपदाची सूत्रे सोपवण्यात आली. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नितीन नांदगांवकर यांना शिवसेनेनं नेतेपदाची सुत्र सोपवली आहेत.

नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून बराच काळ उलटला असली तरी ते संघटनेत फारसे सक्रिय दिसत नव्हते. अखेर शिवसेनेकडून त्यांच्यावर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आता नितीन नांदगावकर या जबाबदारीला कितपत न्याय देणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.