आमदार देवेंद्र भुयार यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाने ठोठावली तीन महिन्यांची शिक्षा

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांना तीन महिने कारावास (Imprisonment) व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा आज ठोठावण्यात आली. भुयार यांनी 28 मे 2019 रोजी पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे (Subhash Bopte)  यांच्या अंगावर माईक व पाणी बॉटल मारली फेकून मारली होती.

तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री (Manisha Khatri) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. तो न्यायालयात सिद्ध झाल्याने भुयार यांना ही शिक्षा झाली. भुयार हे या शिक्षेला जिल्हा न्यायालयात आव्हान देऊ शकतात. त्यामुळे त्यांना तातडीने शिक्षा होणार नाही.