अजितदादांना बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांचे भाजपपुरस्कृत ट्वीट – राष्ट्रवादी

मुंबई   – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांना बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भाजपपुरस्कृत ट्वीट केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार अंजली दमानिया यांना कुणी दिला असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

विद्यमान सरकारच्या अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्टातून यायचा आहे. निकालानंतर नवीन चित्र निर्माण होईल असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे याचा अर्थ त्या स्वतः ला प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत आहेत असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे काम करत आहेत म्हणून बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी हे ट्वीट केल्याचे महेश तपासे म्हणाले.