साऊथची फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडवर भारी का पडत आहे ?

भूमिका शाह : मित्रांनो, अभिनेता सलमान खान खरंच (Salman Khan) बॉलिवूडचा भाईजान कधी बनला? ‘एक था टायगर’ किंवा ‘दबंग’ सारख्या चित्रपटातून त्याला हे शीर्षक मिळालेले नाही, तर त्याचे सर्व श्रेय 2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाला जाते. हा चित्रपट महेश बाबू (Mahesh Babu) अभिनीत तेलगू मूवी ‘पोक्कीरीचा’ (Pokkiri) रिमेक होता ज्याने सलमान खानला सुपरस्टारडम पर्यंत पोहोचवले. बर्‍याच काळापासून, बॉलीवूडचे मसालेदार चित्रपट एकतर रिमेक (remake) बनले आहेत किंवा दक्षिणेकडील चित्रपटांपासून प्रेरित आहेत (inspired by south movies).

याचे कारण म्हणजे दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये एक अद्भुत साहस आहे ज्यामध्ये अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन हे सर्व एकत्र पाहायला मिळते. आता लोक कुटुंबांसोबत दक्षिण भारतीय चित्रपटांचा आनंद घेतात.त्यामुळे दक्षिण भारतीय चित्रपटांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाची इंडस्ट्री असलेल्या बॉलिवूडची क्रेझ कमी होत आहे.तर मित्रांनो, आता प्रश्न येतो की प्रेक्षकांना ओरिजिनल कन्टेन्ट बघायचा आहे तर ते आगामी काळात बॉलिवूडकडे पाठ फिरवतील का? आगामी काळात दक्षिण भारतीय स्टार्ससमोर बॉलीवूड स्टार्स कमी पडतील का? आगामी काळात बॉलिवूडचे अस्तित्व धोक्यात येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून तुम्हाला मिळतील.

हिंदी चित्रपटसृष्टी अनेक दशकांपासून देशभरात वेगळी ओळख आणि वेगळी उंची घेऊन उभी आहे. हिंदी चित्रपटसृष्टी हा संपूर्ण देशाचा दृष्टिकोन मानला जात होता. पण काळाच्या ओघात परिस्थिती बदलत गेली आणि साऊथ सिनेमेही एकत्र भरभराटीला आले. हे नवे ट्रेंड दक्षिणेतील ‘राजामौली’ यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटा पासून सुरु झाले, ज्याला देशभरात भरभरून प्रेम मिळाले. आगोदर बॉलीवूड चे “शोले” (Sholay) ते “दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे” (Dil waale dulhaniya le jaenge) या चित्रपटांनी जे इतिहास रचले तसेच आता निर्माते  बाहुबली सारख्या अनेक फिल्म्स बनवायला लागले आहेत. बॉलीवूडने असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत, ज्यांची देशभरातच नव्हे तर परदेशातही धूम दिसली, पण आता बॉलीवूडचे दिवस बदलत आहेत. असे का घडले? चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

एक काळ असा होता की फक्त ‘रजनीकांत’ (Rajnikant) किंवा ‘चिरंजीवी’ (Chiranjivi)साऊथचे हिरो असा लोकांचा समज होता. पण आता प्रभास, राणा डग्गुबती, महेश बाबू, अल्लू अर्जुन, थलपथ्या विजय, राम चरण, जूनियर एनटीआर दिसत आहेत आणि बॉलिवूडमध्ये साऊथच्या चित्रपटातील अभिनेत्रीही दिसतात. आजही रजनीकांत आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांच्याशिवाय एकही बॉलिवूड अभिनेता दक्षिणेत आपले स्थान निर्माण करू शकला नाही. तर महेश बाबू, अल्लू अर्जुन, प्रभास, एनटीआर देशभर प्रसिद्ध आहेत.

साऊथ चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ते अॅक्शन, ड्रामा आणि अॅडव्हेंचरने भरलेले आहेत, यामध्ये गावापासून सुरू होणारी हिरोची कथा मोठ्या शहरांमध्ये पोहोचते, त्यामुळे प्रेक्षकांना आधुनिक आणि स्थानिक दोन्ही प्रकारचे जीवन अनुभवायला मिळते, परंतु हे सर्व बॉलीवूडच्या बहुतांश चित्रपटांमध्ये दिसून येत नाही. शहरातील लोकांची नाळ अजूनही गावाशी जोडलेली आहे, त्यामुळे हे एक खूप मोठे कारण आहे ज्यामुळे लोकांना दक्षिण भारतीय चित्रपट जास्त आवडतात.

बॉलीवूडच्या इतिहासात सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान असे अनेक सुपरस्टार झाले  ज्यांच्या नावाने चित्रपटगृहांमध्ये गर्दी व्हायची, पण काळाच्या ओघात आता परिस्थिती खूप बदलली असून हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रेक्षकांवरही साऊथच्या कलाकारांची क्रेझ वाढत आहे. जर आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण भारतीय सिनेमेही बॉलीवूडच्या खूप पुढे दिसतात, जेवढे अ‍ॅक्शन आणि उच्च तंत्रे साऊथ सिनेमात दिसतात, ते हिंदी सिनेमातून गायब आहेत, एकूणच हिंदी सिनेमाचे तंत्र ते करण्यात मागे असल्याचे दिसते.

बॉलीवूडला साऊथ फिल्म्सकडूनच चित्रपटाचे शूटिंग 2 महिन्यांत पूर्ण करण्याची संकल्पना मिळाली आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे साऊथ चित्रपटांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान मजबूत करू शकले,यामध्ये  ‘ऐश्वर्या राय,दीपिका पदुकोण’ सारख्या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. साऊथ सिनेमाच्या हिंदी रिमेकची मागणी बॉलीवूडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, यावरून आपण अंदाज लावू शकतो कि साऊथ  फिल्म्सच्या स्क्रिप्ट बॉलीवूड पेक्षा ही चांगले आहेत. साऊथमध्ये जेवढी सुंदर सिनेमॅटोग्राफी पाहायला मिळते ती बॉलिवुडमध्ये नाही दिसत.तसेच, साऊथच्या सुपरहिट चित्रपटांचा रिमेक करणे हा बॉलीवूड दिग्दर्शकांचा एक नवीन पॅशन बनला आहे, आज 10 पैकी ८ चित्रपट रिमके किंवा एक्सटेंडेड version असतात. आणि उरलेल  निर्माते कोरियन फिल्म, साउथ फिल्म्स किंवा हॉलीवूड फिल्म्सची स्क्रिप्ट टाकतात आणि मग त्याच जुन्या शैलीत प्रेक्षकांसमोर आणतात.  त्यामुळे हिंदी प्रेक्षकांनाही कंटाळा येऊ लागला आहे आणि आता हा जुना  झालेला ट्रेंड बदलण्याची गरज आहे.

पूर्वी साऊथचे कलाकार बॉलीवूडमध्ये यायचे तेव्हा त्यांना तेवढा मान मिळत नसे आणि त्यांना नेहमीच साईड अॅक्टरची भूमिका दिली जायची, पण आता फक्त साऊथचे कलाकारच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माते यांचेही बॉलीवूडमध्ये मोठे स्थान आहे. आता त्यांच्या स्वतःच्या अटींवर ते बॉलीवूड मध्ये काम करतात. आणि त्यांना नाराज करणे हिंदी चित्रपट निर्मात्यांना परवडणारे नाही.आणि असे अनेक साऊथ स्टार्स आहेत जे बॉलीवूड निर्मात्यांकडून प्रचंड पैसे घेत आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे पिक्चर आणि रोल साइन करत आहेत. आज दक्षिण भारतीय स्टार्स आणि त्यांचे सिनेमे बॉलीवूडपेक्षा कमी नाहीत तर बॉलीवूड सिनेमांच्या तुलनेत साऊथचे चित्रपट चे बॉक्स ऑफिस कलेक्शन जास्त दिसत आहे.बॉलीवूड चित्रपट मुख्यतः मुंबईतील रहिवाशांना लक्षात ठेवून बनवले जातात आणि हे चित्रपट त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे दक्षिण भारतीय चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही तर उत्तर भारतातही भरपूर कमाई करतात. मित्रांनो, जर आपण राजामौलीच्या बाहुबली मालिकेबद्दल बोललो, तर या मालिकेतील दोन्ही चित्रपटांनी उत्तर भारतात धुमाकूळ घातला,अलीकडेच, पुष्पा  चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीनेही जबरदस्त कोटींची कमाई केली आणि त्याचा परिणाम रणवीर सिंगच्या 83 वर झाला आणि त्याला बॉक्स ऑफिसवरून हटवावे लागले. आणि आता भारतीय प्रेक्षक केवळ ओरिजिनल कन्टेन्ट पाहण्यास प्राधान्य देतात आणि कॉपी केलेली आवृत्ती नाही. या सर्व कारणांमुळे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी लोकांना बॉलीवूड पेक्षा जास्त आवडू लागली आहे.