ब्रिजभूषण सिंह हे मला मोठ्या भावासारखेच आहेत – संजय सिंह

Sakshi Malik Retired From Wrestling: साक्षी मलिकने डोळ्यात अश्रू आणत कुस्तीतून संन्यास घेतला. माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंग WFI चे अध्यक्ष झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला. संजय सिंह (Sanjay Singh) यांनी माजी कुस्तीगीर अनिता श्योरण यांचा ४० विरुद्ध सात मतांनी पराभव केला.

“पहिल्या दिवसापासून निवडणूक आमच्या हातात होती. सत्याचा विजय झाला,” अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांनी दिली आहे. तसेच, “ब्रिजभूषण सिंह हे मला मोठ्या भावासारखेच आहेत,” असंही संजय सिंह यांनी म्हटलं.

२००९ साली ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते, तेव्हा संजय सिंह हे उपाध्यक्ष होते. ब्रिजभूषण सिंह यांच्याशी फार पूर्वीपासून मैत्री असल्याचं संजय सिंह यांनी म्हटलं. ब्रिजभूषण सिंह हे मला मोठ्या भावासारखे आहेत. ब्रिजभूषण सिंह (brijbhushan singh) आणि आमचे कुटुंब काशी व अयोध्येत कुस्त्यांच्या स्पर्धांचे आयोजन करायचे, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो,असं संजय सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली