खान कुटुंबात लवकरच वाजणार सनई चौघडे, दीर्घ प्रतिक्षेनंतर ‘हा’ अभिनेता करतोय लग्न

Arbaaz Khan Second Marriage: लवकरच खान कुटुंबात सनई चौघड्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचा भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) पुन्हा एकदा घोड्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, मलायकासोबत घटस्फोट आणि जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ५६ वर्षीय अरबाजला पुन्हा त्याचे प्रेम मिळाले आहे. अरबाज खान त्याची गर्लफ्रेंड शौरा खानसोबत २४ डिसेंबरला लग्न करणार आहे. लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. अरबाज खानचा ६ वर्षांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोरासोबत घटस्फोट झाला होता.

वधू कोण आहे?
अरबाजच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. त्याची वधू कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. अरबाजच्या लेडी लव्हचे नाव शौरा खान आहे. शौरा एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत काम करते. शौरा ही रवीना टंडन आणि तिची मुलगी राशाची मेकअप आर्टिस्ट देखील आहे. पण आता ती खान कुटुंबाची सून होणार आहे.

पहिली भेट कशी झाली?
अरबाज आणि शौरा (Shura Khan) यांची पहिली भेट अभिनेत्याच्या आगामी ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघेही एकमेकांसाठी खूप गंभीर असल्याचे बोलले जात आहे. दोघांनाही लग्नाची घाई होत आहे. मात्र या दोघांचे लग्न अगदी गुप्त पद्धतीने होणार आहे. म्हणजेच अरबाज-शौरा यांच्या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली