धावत्या स्कूटरवर गर्लफ्रेंडला समोर बसवून मुलाने सुरू केला रोमान्स, Video तुफान व्हायरल

Couple Bike Stunt Viral Video: बाईकवर स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. मुंबईतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक कपल स्कूटीवर बसून रोमान्स करत आहे. या जोडप्याचा व्हिडिओ पाहून लोक त्याला ‘छपरी’ म्हणत आहेत.

हा व्हिडिओ मुंबईतील वांद्रे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. एक मुलगा स्कूटर चालवत आहे तर मुलगी मुलाच्या समोर बसली आहे आणि तिचा चेहरा मुलाकडे आहे. ते दोघेही चादरीने झाकलेले आहेत. मागून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला आहे. शूट होत असलेला व्हिडिओ पाहून मुलगी हसत आहे. त्यामुळे तरुणीने मुद्दाम हा व्हिडिओ बनवला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुलगी स्कूटरवर उलटी बसली आहे आणि स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीला मिठी मारत आहे. या दोघांनी स्वतःला चादरने झाकले आहे. या व्हिडिओमध्ये दोघांनीही धोकादायक पद्धतीने वाहन चालवून कायदा तर मोडलाच पण दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही. आता हा व्हिडिओ पाहून लोक कारवाईची मागणी करत आहेत.

एकाने लिहिले की ते फक्त लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना माहित आहे की ते व्हायरल होतील, पोलिसांना टॅग केले जाईल आणि त्यांवर कारवाई देखील केली जाईल. या लोकांना फक्त हेडलाइन्समध्ये राहायचे असते. आणखी एका सोशल मीडिया वापरकर्त्याने व्हिडिओवर लिहिले की, असे स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.

मात्र, असे व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक शहरांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून पोलिसांनी कारवाईही केली आहे. मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक मुलगा चौरस्त्यावर गाडी चालवत आंघोळ करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

‘मी मृतदेह पिशवीत नेला, पण मी मुलाची हत्या केली नाही’, सूचना सेठचा दावा

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका