सावरकर समजून घ्यायचे असतील तर राहुल गांधीने माझ्या व्याख्यानाला यावे – Sharad Ponkshe

Sharad Ponkshe : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या बिचाऱ्या राहुल गांधीला (Rahul Gandhi) सावरकर समजलेलेच नाहीत. तो वेडसर आहे. अनेकदा त्याचे व्यक्तव्य हे राजकीय स्वार्थासाठी असू शकते. मात्र, सावरकर समजून घ्यायचे असतील तर त्याने माझ्या व्याख्यानाला यावे, असे आव्हान ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

ते म्हणाले, सावरकरांबद्दल बोलायला उंची लागते. ज्यांना सावरकर कळत नाही किंवा केवळ विरोध करायचा म्हणून राहुल गांधी सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करत असतात. त्याला कोणीतरी समजून सांगायला पाहिजे, नाहीतर त्याने माझ्या व्याख्यानाला यावे आणि सावरकर समजून घ्यावे.

सावरकरांबाबत जेवढे बेताल व वादग्रस्त वक्तव्य कराल तेवढे सावरकर वाचले जातील. आपण महापुरुषाची व्यक्ती म्हणून पूजा करता. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक महामानव आहेत. मात्र, आपण त्यांना देव बनवून पूजा करत असतो. त्यांची नकारात्मक बाजू दाखवली की मारामारी व हिंसा करतो. हे टाळले पाहिजे, असेही पोंक्षे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली